parliament

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा(Parliament monsoon Session Dates) ठरवण्यासाठी गेल्या आठवड्यात समितीची बैठक घेण्यात आली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही.

    दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session Of Parliament) १९ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरवण्यासाठी गेल्या आठवड्यात समितीची बैठक घेण्यात आली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही.


    संसदेच्या या अधिवेशनात २० दिवस कामकाज चालेल. या दरम्यान, सरकार अनेक बिले सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासले जाण्याची शक्यता आहे.