singing parrot

‘Tico The Parrot’ अशा नावाने प्रसिद्ध असणारा एक पोपट खूप सुंदर गातो. या पोपटाचा व्हिडिओ(Singing Parrot Video) सध्या व्हायरल होत आहे.

    पोपट माणासासारखा बोलताना किंवा भविष्य सांगताना पण तुम्ही कधी गाणारा पोपट बघितला आहे का?  ‘Tico The Parrot’ अशा नावाने प्रसिद्ध असणारा एक पोपट खूप सुंदर गातो. या पोपटाचा व्हिडिओ(Singing Parrot Video) सध्या व्हायरल होत आहे. एकूण ३३ सेंकदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

    व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गिटार वाजवताना दिसत आहे. त्याचवेळी त्याच्यासमोर बसलेला एक पोपट गिटारच्या धुनवर सूर लावून गाण गाण्याचा प्रयत्न करत आहे. हा पोपट क्लासिक रॉक धुनमध्ये गाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

    ‘Tico The Parrot’ असं या प्रसिद्ध पोपटाचं गाण असलेला हा व्हिडिओ @rtnordy या अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. लोक हा व्हिडिओ पाहून या पोपटाच्या प्रेमात पडले आहेत. त्याच्या गाण्याच्या कौशल्याचे सगळे कौतुक करत आहेत.