प्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच सहभाग; बांगलादेशच्या सैनिकांचे राजपथावर संचलन

राजपथाच्या संचलनात यंदा दोन पथके सहभागी होणार असून, त्यातील एक संचलन करणारे, तर एक बँड पथक आहे. लष्करी संचलन पथकामध्ये तिन्ही दलाचे सैनिक सहभागी होणार असून, त्यात हवाई लेफ्टनंट, नौदल लेफ्टनंट, मेजर आणि तीन लेफ्टनंट कर्नल यांचा समावेश आहे, अशी माहिती २६ वर्षे लष्करी सेवा देणारे कर्नल चौधरी यांनी दिली.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली.

प्रजासत्ताकदिनी भारतीय जवानांच्या बरोबरीने पहिल्यांदाच बांगलादेशच्या लष्कराचे १२२ सैनिक राजपथावर संचलन करणार आहे. दरम्यान पथकाचे नेतृत्व करीत असलेले बांगलादेशच्या लष्कराचे कर्नल मोहताशिम हैदर चौधरी यांनी सरावानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारताच्या ७२व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी होणे, हा आमच्यासाठी बहुमान आहे, असे ते यावेळी म्हणाले.

तिन्ही दलातील सैनिकांचा समावेश

राजपथाच्या संचलनात यंदा दोन पथके सहभागी होणार असून, त्यातील एक संचलन करणारे, तर एक बँड पथक आहे. लष्करी संचलन पथकामध्ये तिन्ही दलाचे सैनिक सहभागी होणार असून, त्यात हवाई लेफ्टनंट, नौदल लेफ्टनंट, मेजर आणि तीन लेफ्टनंट कर्नल यांचा समावेश आहे, अशी माहिती २६ वर्षे लष्करी सेवा देणारे कर्नल चौधरी यांनी दिली.

बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांची जन्मशताब्दी आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षी आमचा मित्रदेश भारताच्या संचलनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे, ही मोठी बाब असल्याच्या भावना यावेळी त्यांनी मांडल्या. उल्लेखनिय असे की, भारताच्या संचलनामध्ये बाहेरील देशांच्या पथकाने सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे.