pathshodh

पॅथशोध हेल्थकेअर(Pathshodh Healthcare) या कंपनीने हे इलेक्ट्रोकेमिकल मशीन तयार केलं आहे. कोरोनानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडी तपासण्याचं हे पहिलंच मशीन(Antibodies counting machine असल्याचं बोललं जात आहे.

    बंगळुरूमधल्या भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेतल्या संशोधकांनी(Researchers) कोरोनाच्या अँटिबॉडी तपासण्यासाठीचं एक मशीन(antibodies checking machine) तयार केलं आहे. या मशीनमुळे  मानवी शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी तपासता येणार आहेत.

    सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट तसंच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथे असलेल्या पॅथशोध हेल्थकेअर या कंपनीने हे इलेक्ट्रोकेमिकल मशीन तयार केलं आहे. कोरोनानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडी तपासण्याचं हे पहिलंच मशीन असल्याचं बोललं जात आहे. आयसीएमआरने या मशीनच्या विक्रीला परवानगी दिली आहे.  येत्या दोन ते तीन आठवड्यात हे मशीन बाजारात येणार आहेत.

    पॅथशोधचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विनय कुमार यांनी सांगितलं की, या तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी शरीरातल्या करोनाच्या अँटिबॉडीज सू्क्ष्म पातळीवरही शोधता येतील. यासाठी रक्ताची तपासणी किंवा रक्तघटकाची तपासणी करावी लागेल. रक्त किंवा रक्तघटकाच्या नमुन्याच्या आधारे या अँटिबॉडी तपासता येतील. येत्या दोन ते तीन आठवड्यात आम्ही हे मशीन बाजारात आणण्याच्या विचारात आहोत.

    पॅथशोध सध्या दर महिन्याला १ लाख यंत्रं तयार करु शकते. यात पुढे जाऊन वाढही होऊ शकते. या मशीनसोबत चाचण्यांसाठीच्या स्ट्रिप्स मिळणार आहेत. ज्यामुळे आपल्याला अँटिबॉडीजचं प्रमाण कळून येईल. या मशीनच्या स्क्रिनवरती लगेचच आपल्याला या चाचणीचा निष्कर्ष पाहायला मिळेल. त्यामुळे यामध्ये कोणतीही एरर असणार नाही.

    यामध्ये असलेल्या चिपमध्ये एक लाखांहून अधिक चाचण्यांचे निष्कर्ष साठवून ठेवता येऊ शकतात. याला टचस्क्रिन डिस्प्ले, रिचार्ज करता येणारी बॅटरी, स्मार्टफोनसोबत जोडलं जाण्यासाठी ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा, स्टोरेज अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.