पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही स्थिरता, सामान्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचे दर?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होत असताना देखील देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. मुंबईत आज पेट्रोलची किंमत ९७.५७ रूपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत ८८.६० रूपये इतकी आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे ९१.१७ आणि ८१.४७ रुपये इतकी आहे.

  मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात मागील २० दिवसांपासून स्थिरता असल्यामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होत असताना देखील देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. मुंबईत आज पेट्रोलची किंमत ९७.५७ रूपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत ८८.६० रूपये इतकी आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे ९१.१७ आणि ८१.४७ रुपये इतकी आहे.

  फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली होती. महाराष्ट्रात विधीमंडळाच्या अधिवेशनात सुद्दा पेट्रोल-डिझेलवर काहीतरी तोडगा निघेल. अशा प्रकारची आस सर्व सामान्यांना होती. परंतु त्यावरच मंत्र्यांनी एकही भाष्य न केल्यामुळे सामान्यांच्या खिशाला गळती लागली.

  देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  मुंबई : पेट्रोल – ९७.५७ रुपये/लिटर
  डिझेल – ८८.६० रुपये/लिटर

  दिल्ली : पेट्रोल – ९१.१७ रुपये/लिटर
  डिझेल – ८१.४७ रुपये/लिटर

  कोलकाता : पेट्रोल – ९१.३५ रुपये/लिटर
  डिझेल – ८४.३५ रुपये/लिटर

  चेन्नई : पेट्रोल- ९३.११ रुपये/लिटर
  डिझेल- ८६.४५ रुपये/लिटर

  दरम्यान, केंद्र सरकारकडून पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रूपये प्रतिलिटर इतका कर लागतो. तर राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. राज्य सरकार पेट्रोलच्या किंमतीवर २५ टक्के व्हॅट लावते. तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. त्यामुळे यावरही अधिकचा सेस लावला जातो. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती सातत्याने बदलत असतात. त्यामुळे सकाळी ६ वाजताच्या दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती आणि काय आहेत. याची सामान्यांना माहिती होण्यास मोठी मदत होते.