सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर ?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इंधन कंपन्यांकडून सलग बाराव्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. आज गुरूवार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात ४३ पैशांची वाढ करण्यात

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इंधन कंपन्यांकडून सलग बाराव्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. आज गुरूवार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात ४३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर हा ७७ रूपये ८१ पैसे प्रतिलिटर इतका आहे. तर डिझेलचा दर हा ७६ रुपये ४३ पैसे प्रतिलिटर आहे. त्यामुळे कालच्या आणि आजच्या दिवसात अधिक दरवाढ झाल्याचे दिसत आहे. दिल्लीत काल बुधवारी पेट्रोलच्या दरात ५५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली होती. 

तसेच सलग अकराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर ८४.६५ रुपये प्रतिलिटर  व डिझेलचे दर ७४.९१ रुपये प्रतिलिटर, तर पुण्यात पेट्रोलचा आजचा दर ८४.३८ पैसे प्रतिलिटर व डिझेलचा दर ७३.५४ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोलचे दर ८१.३२  रूपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ७४.२३  रूपये प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि चेन्नईमध्ये सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर हा ७९.५९ रुपये आणि डिझेलचा दर हा ७१.९६ रुपये प्रतिलिटर आज झाले आहे.