सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर ?

देशात कोरोना विषाणूचं सावट घोघांवत आहे. अशातचं पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याची दृश्यं दिसत आहेत. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं

देशात कोरोना विषाणूचं सावट घोघांवत आहे. अशातचं पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याची दृश्यं दिसत आहेत. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर हा ७६.७३ रूपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा दर हा ७५.१९ रूपये प्रतिलीटर इतका झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

दरम्यान, काल सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली होती. तसेच दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३.६२ रूपये प्रतिलीटर आणि डिझेलचे दर ७३.७५ रूपये प्रतिलीटर इतके झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चैन्नईत पेट्रोलचा दर हा ८०.३७ रूपये प्रतिलीटर, तर डिझेलचा दर हा ७३.१७ रूपये प्रतिलीटर झाला आहे.