पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, मुंबईत शंभरीपार; सर्वसामान्यांच्या खिशावर भार

दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर १०६ रुपये ९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७ रुपये ४६ पैसे इतकी किंमत झाली आहे.

  अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक पेच निर्माण झालेला असताना सर्वसामान्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कुणाचे कर जास्त? यावरून एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असताना सर्वसामान्य जनता मात्र हा अतिरिक्त आर्थिक भार सहन करत आहे.

  दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर १०६ रुपये ९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७ रुपये ४६ पैसे इतकी किंमत झाली आहे. दुसरीकडे कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १०१.०१ रुपये आणि ९२.९७ रुपये तर भोपाळमध्ये ते १०९.२४ रुपये आणि ९८.६७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहेत.

  चार प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती – 

  दिल्ली – पेट्रोल १००.९१ रुपये आणि डिझेल ८९.९८ रुपये प्रतिलिटर
  मुंबई – पेट्रोल १०६.९२ रुपये आणि डिझेल ९७.४६ रुपये प्रतिलिटर
  चेन्नई – पेट्रोल १०१.६७ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
  कोलकाता – पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये प्रतिलिटर