दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पेट्रोल डिझेल पुन्हा महागले, आज इतक्या पैशांनी वाढले दर

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचं सत्र कायम आहे. देशभरात पेट्रोलचे भाव ३५ पैशांनी तर डिझेलचे भाव ३८ पैशांनी वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही पेट्रोलिअम कंपन्यांनी वाढ केलीय. त्यामुळे इंधनाच्या भाववाढीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. 

  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १२ दिवस वाढ नोंदवल्यानंतर गेले दोन दिवस दरवढीनं ब्रेक घेतला होता. शनिवारी झालेल्या भाववाढीनंतर रविवार आणि सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवारी) पु्न्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ नोंदवण्यात आलीय.

  दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचं सत्र कायम आहे. देशभरात पेट्रोलचे भाव ३५ पैशांनी तर डिझेलचे भाव ३८ पैशांनी वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही पेट्रोलिअम कंपन्यांनी वाढ केलीय. त्यामुळे इंधनाच्या भाववाढीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

  मुंबईत आता एक लिटर पेट्रोलसाठी ९७.३४ रुपये तर डिझेलसाठी ८८.४४ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी ९०.९३ रुपये तर एक लिटर डिझेलसाठी ८१.३२ रुपये द्यावे लागत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे चढे टॅक्स आणि क्रूड ऑईलचे वाढते भाव यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत असल्याचं चित्र आहे. पेट्रोलच्या एकूण किंमतीतील सुमारे ७० टक्के भाग हा करांचा आहे. त्यामुळे क्रूड ऑईलचे भाव कमी असतानादेखील नागरिकांना चढ्या दरानं पेट्रोल खरेदी करावं लागत होतं.

  विविध शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

  • मुंबई – ९७.३४ / ८८.४४
  • दिल्ली – ९०.९३ / ८१.३२
  • कोलकाता – ९१.१२ / ८४.२०
  • चेन्नई – ९२.९० / ८६.३१
  • बंगळुरू – ९३.९८ / ८६.२१
  • हैदराबाद – ९४.५४ / ८८.६९