सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

दिल्लीमध्ये काल पेट्रोलची किंमत 101.23 रुपयांवर गेली होती तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घट झाली असून त्याची किंमत 89.76 रुपये इतकी झाली होती. देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. दरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. 

    नवी दिल्ली : देशात पेट्रोलच्या किंमतीत सोमवारी वाढ झाली होती. सोमवारी पेट्रोल 28 पैशांनी महाग झालं असून मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 107.20 रुपयांवर गेली होती.  तर डिझेलची किंमत 17 पैशांनी घटून ती 97.29 रुपयांवर पोहोचली होती. दिल्लीमध्ये काल पेट्रोलची किंमत 101.23 रुपयांवर गेली होती तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घट झाली असून त्याची किंमत 89.76 रुपये इतकी झाली होती. देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.

    दरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.

    देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

    पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

    इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

    इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.