स्वस्तात देणार त्याच्याकडूनच इंधन खरेदी करणार – केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भूमिका

जो देश स्वस्त दरात(cheap rate) आणि योग्य व्यावसायिक अटींवर इंधन पुरवठा करण्यास सहमत असेल त्याच देशाकडून भारत इंधन खरेदी करणार असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान(dharmendra pradhan) यांनी व्यक्त केले आहे. उत्पादन नियंत्रण शिथील करण्याबाबत विनंती केल्यानंतरही सौदी अरेबियाने योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे प्रधान यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

    दिल्लीः जो देश स्वस्त दरात(cheap rate) आणि योग्य व्यावसायिक अटींवर इंधन पुरवठा करण्यास सहमत असेल त्याच देशाकडून भारत इंधन खरेदी करणार असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान(dharmendra pradhan) यांनी व्यक्त केले आहे. उत्पादन नियंत्रण शिथील करण्याबाबत विनंती केल्यानंतरही सौदी अरेबियाने योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे प्रधान यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. रणनीतीक आणि आर्थिक निर्णय घेतेवेळी भारत आपल्या हितांचे नेहमीच संरक्षण करेल असेही ते म्हणाले. भारतात इंधनाची मागणी असून जो कमी किंमतीत देणार त्याच्याकडून इंधन खरेदी करू, असे ते म्हणाले.

    सौदी मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी
    उत्पादनात कपात आणि किंमत कमी करण्याच्या भारताच्या विनंतीवर सौदी अरबचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुल अजीज बिन सलमान यांनी दिलेल्या उत्तरावर प्रधान यांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही मित्र देशाचे उत्तर गैरराजकीय आहे, असे ते म्हणाले. उल्लेखनीय असे की सौदी मंत्र्यांनी भारताने उत्पादक देशांना उत्पादन वाढविण्यास सांगण्याऐवजी व किंमत थोपविण्याची विनंती करण्याऐवजी आपल्याच भागात तेलाचा साठा शोधावा असे उत्तर दिले होते.

    इंधन कंपन्या स्वतंत्र
    दरम्यान, आम्ही कोणाजवळ जात आहो हा प्रश्न नाही तर आ मच्या हितांचे संरक्षणासाठी कोण उपयुक्त आहे ते महत्त्वाचे आहे असे प्रधान म्हणाले. भारत एक खुला बाजार असून देशातील इंधन कंपन्या जगातील कोणत्याही भागातून इंधन खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असेही प्रधान म्हणाले.