बारावीला गणित आणि फिजिक्स नसेल तरीही इंजिनिअरिंगला प्रवेश, नव्या निर्णयाचा अनेकांना होणार फायदा

यापुढे बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय नसतील, तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी संस्थेनं एकूण १४ विषयांची यादी जाहीर केलीय. यापैकी कुठल्याही तीन विषयांत जर ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण विद्यार्थ्यांनी मिळवले असतील, तर त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

    इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेणं आतापर्यंत सक्तीचं होतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यांचा ए ग्रुप, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा बी ग्रुप अशी शिक्षणपद्धतीची पारंपरिक रचना होत. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतले नसतील, त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नसे. मात्र यापुढे हे चित्र बदलणार आहे.

    यापुढे बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय नसतील, तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी संस्थेनं एकूण १४ विषयांची यादी जाहीर केलीय. यापैकी कुठल्याही तीन विषयांत जर ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण विद्यार्थ्यांनी मिळवले असतील, तर त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    हे आहेत १४ विषय

    या निर्णयाबाबत वेगवेगळी मते शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. गणित हाच सर्व शास्त्रांचा पाया असल्यामुळे इंजिनिअरिंगसाठी गणित हा विषय असणे आवश्यक आहे. बारावीत गणिताचा पाया पक्का होतो. त्यासाठी गणित विषय सक्तीचा असणेच गरजेेचे आहे, असे मत काही प्राध्यापक व्यक्त करत आहेत. तर जुन्या शिक्षणपद्धतीत सुधारणा करून केवळ गणित आणि भौतिकशास्त्र विषय घेतला नाही, या कारणासाठी विद्यार्थ्याना इंजिनिअर होण्यापासून रोखणं चुकीचं असल्याचं मतही व्यक्त होतंय.