पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एम्स रुग्णालयात आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही कोरोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा”.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याबाबत मोदींनी ट्विट करत माहिती दिली आहे. १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले होते . लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती.

    मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एम्स रुग्णालयात आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही कोरोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा”.

    दरम्यान देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. एकूण १ लाख १५ हजार ७३६ इतके रुग्ण चोवीस तासांत सापडले आहेत. दिवसातील बळींची संख्या ६३० नोंदवली गेली आहे.