पंतप्रधान मोदी शिक्षक-विद्यार्थी आणि शिक्षणासंबंधित लोकांना संबोधित करणार ; अनेक महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता

शिक्षण मंत्रलायाच्या शिक्षकांचे अमूल्य योगदान आणि नवी शिक्षण निती २०२० पुढे चालवण्यासाठी ५-१७ सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरा केला जात आहे. याच पार्शवभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत

    आज ७ सप्टेंबर ‘शिक्षक पर्वा’च्या उद्घाटन संम्मेलनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक-विद्यार्थी आणि शिक्षणासंबंधित लोकांना व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. यावेळी ते शिक्षण क्षेत्रासंबंधित काही महत्वपूर्ण घोषणा सुद्धा करण्याची शक्यता आहे.

    काय आहे शिक्षक पर्व?

    शिक्षण मंत्रलायाच्या शिक्षकांचे अमूल्य योगदान आणि नवी शिक्षण निती २०२० पुढे चालवण्यासाठी ५-१७ सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरा केला जात आहे. याच पार्शवभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.पीएमओ कडून असे सांगण्यात आले आहे की, शिक्षक पर्व हा उत्सव हा केवळ सर्व स्तरावरील शिक्षणाची निरंतरता सुनिश्चित करणार नसून देशभरातील सर्व शाळांना क्वालिटी, इंक्सूसिव प्रॅक्टिसिस आणि सस्टेनेबिलिटीमध्ये सुधार आणण्यासाठी इनोव्हेटिव प्रॅक्टिसिसला प्रोत्साहन देणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अन्य शिक्षण राज्य मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत.