आजपासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते जंगी उद्घाटन

देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला पुढील वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षं पूर्ण होतायत. त्याअगोदर ७५ आठवडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. अहमदाबादमध्ये याचं औपचारिक उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल आणि त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पुढील ७५ आठवडे विविध कार्यक्रमांचं आयोजन होत राहिल आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी एका जंगी सभारंभाने या महोत्सवाची सांगता करण्याचं नियोजन करण्यात आलंय. 

    भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील अहमदाबादमध्ये याचं उद्घाटन होणार आहे. यावेळी अहमदाबादमधील साबरमती आश्रमापर्यत एक प्रतिकात्मक पदयात्रा आयोजित करण्यात आलीय. आज म्हणजेच १२ मार्च रोजी महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला ९१ वर्षं पूर्ण होत आहेत. याच दिवसापासून स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला पुढील वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षं पूर्ण होतायत. त्याअगोदर ७५ आठवडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. अहमदाबादमध्ये याचं औपचारिक उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल आणि त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पुढील ७५ आठवडे विविध कार्यक्रमांचं आयोजन होत राहिल आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी एका जंगी सभारंभाने या महोत्सवाची सांगता करण्याचं नियोजन करण्यात आलंय.

    पुढील वर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारनं जोरदार तयारी सुरू केलीय.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेसाठी २५९ जणांची समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.

    माजी राष्ट्पती प्रतिभाताई पाटील, सरन्यायाधीस एस. ए. बोबडे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, २८ मुख्यमंत्री, भारतरत्न लता मंगेशकर, नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बहुतांश केंद्रीय मंत्र्यांचा यात समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचाही यात समावेश आहे.

    यापूर्वी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालीदेखील एका समितीची स्थापना कऱण्यात आली आहे. तर सचिवांची एक वेगळी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा उत्सव स्वातंत्र्यदिनाला ७५ आठवडे असतानाच सुरु होणार आहे.