#MannKiBaat | पंतप्रधान मोदींची ७२ वी 'मन की बात', आत्मनिर्भरतेचा पुन्हा नारा | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेटDecember, 27 2020

पंतप्रधान मोदींची ७२ वी ‘मन की बात’, आत्मनिर्भरतेचा पुन्हा नारा

द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
11:47 AMDec 27, 2020

पंतप्रधानांचा पुन्हा प्लास्टिकमुक्तीचा नारा

स्वच्छ भारत हे सर्वांचंच स्वप्न असून देशाला सिंग युज्ड प्लॅस्टिकपासून वाचवण्यासाठी कटिबद्ध होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

11:45 AMDec 27, 2020

टी श्रीनिवासाचार्य स्वामींचा गौरव

तमिळनाडूतील ९२ वर्षांचे टी. श्रीनिवासाचार्य स्वामी हे नवं तंत्र शिकत असून स्वतः कॉम्प्युटरवर टायपिंग करत नवं पुस्तक लिहीत असल्याचं सांगत वयाचा आणि ऊर्जेचा संबंध नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

11:37 AMDec 27, 2020

काश्मीरच्या केशराला जागतिक ओळख मिळवून देणार - मोदी

काश्मीरचं केसर हे देशाचं वैभव असून त्याची जागतिक पातळीवर ओळख करून देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

11:36 AMDec 27, 2020

मोदींकडून तरुणाईचा गौरव

आजच्या तरुणाईला काहीच अशक्य नसून या तरुणाईचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

11:34 AMDec 27, 2020

गुरु गोविंद सिंहांच्या मातेला अभिवादन

आज गुरु गोविंद सिंह यांना वंदन करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. गेल्या आठवड्यात आपण गुरु गोविंद सिंह यांना नमन केलं होतं, याची आठवणही त्यांनी करून दिलीय.

11:31 AMDec 27, 2020

दैनंदिन वापरात स्वदेशीचं प्रमाण वाढवण्याचं आवाहन

नागरिकांनी रोजच्या वापरात आपण कुठल्या परदेशी वस्तू वापरतो, त्याची यादी करावी आणि त्यानंतर एकेका वस्तूूचा स्वदेशी पर्याय निवडावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

11:29 AMDec 27, 2020

वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा

२०१४ ते २०१८ या काळात देशातील वाघांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. २०१४ साली देशात ७९०० वाघ होते. तर २०१८ मध्ये वाघांची संख्या १२,८५२ वर गेल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

11:26 AMDec 27, 2020

व्होकल फॉर लोकल

घराघरात जेव्हा 'व्होकल फॉर लोकल' हा मंत्र घुमू लागेल, तेव्हा आपली उत्पादनं खऱ्या अर्थानं जागतिक दर्जाची झालेली असतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

11:24 AMDec 27, 2020

ग्राहकांच्या मानसिकतेतही झालाय बदल

कोरोनामुळे ग्राहकांच्या मानसिकतेतही बदल झाला असून ते आता मेड इन इंडिया खेळणी मागत असल्याचं निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवलं.

कोरोनानं जगाच्या अर्थव्यवस्थेची घडी बिघडवली. मात्र आपण या संकटातूनही काहीतरी शिकलो, असं प्रतप्रधान मोदी म्हणाले. आत्मनिर्भरतेचा धडा कोरोनामुळे मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.