pm narendra modi office in varanasi olx sale police take action
पंतप्रधानांचं कार्यालयच काढलं होतं OLX वर विकायला; पुढे काय घडलं हे तुम्हीच वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघ असलेल्या वाराणसीत एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. काही नसत्या उठाठेवी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालयच OLX वर विकायला काढलं आहे.

उत्तरप्रदेश : वाराणसीस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय काही लोकांनी विकायला काढलं आहे. आता या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाचा फोटो काढून OLX वर टाकला आणि याची किंमत ७.५ कोटी रुपये सांगितली आहे. OLX वर जी जाहिरात देण्यात आली आहे, त्यात कार्यालयाच्या आतील माहिती, खोल्या, पार्किंगची सुविधा आणि अन्य सर्व बाबींची माहिती दिली आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर ती जाहिरात ओएलएक्सवरून हटवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चारजणांना ताब्यातही घेतलं आहे. ज्या व्यक्तीने फोटो काढून OLX वर टाकला होता, त्यालाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी निवेदनही जारी केले होते. पोलिसांच्या मते, या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. एकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांच्या मतदार संघात कार्यालय आहे. या ठिकाणी लोकं आपल्या तक्रारी घेऊन येतात. पंतप्रधान मोदींचं हे कार्यालय वाराणसीच्या भेलूपूर ठाणे क्षेक्षातील जवाहरनगर एक्सटेंशन येथे आहे.

पंतप्रधान मोदी सातत्याने वाराणसीतल्या जनतेशी संवाद साधत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाराणसीचा दैराही केला होता. याशिवाय अनेक कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होत असतात.