“योगी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडून जाणार” ज्येष्ठ शायर मुनव्वर राणा यांचा इशारा

“उत्तर प्रदेशात येऊन ओवेसी इथल्या मुस्लिमांना फसवत आहेत. अशा प्रकारे ते मुस्लिमांच्या मतांमध्ये फूट पाडून भाजपला मदत करत आहेत. अशा परिस्थितीत जर ओवेसीच्या मदतीने भाजपने राज्य जिंकले आणि योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी यूपी सोडून परत कोलकाताला जाईन.” असा इशाराच मुनव्वर राणा यांनी दिला आहे. राणा यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी, “आयेगा तो योगी ही” असं म्हटलं आहे.

    ज्येष्ठ आणि प्रसिध्द शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एटीएसने राजधानीत दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणाबद्दल प्रतिक्रीया देताना ज्येष्ठ शायर मुनव्वर राणा म्हणाले की, “निवडणुका जिंकण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. कोणत्याही प्रकारे मुस्लिमांना त्रास देणे हे भाजपा सरकारचे एकमेव काम आहे. मग ते धर्मांतरण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा असो किंवा दहशतवादाच्या नावाखाली अटक करणे असो. हे त्याचेच प्रकार आहेत.”

    “उत्तर प्रदेशात येऊन ओवेसी इथल्या मुस्लिमांना फसवत आहेत. अशा प्रकारे ते मुस्लिमांच्या मतांमध्ये फूट पाडून भाजपला मदत करत आहेत. अशा परिस्थितीत जर ओवेसीच्या मदतीने भाजपने राज्य जिंकले आणि योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी यूपी सोडून परत कोलकाताला जाईन.” असा इशाराच मुनव्वर राणा यांनी दिला आहे.

    घर विकणे आहे, असा बोर्ड मी माझ्या घरावर लावेल. माझा योगींना आक्षेप नाही. पण योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आवश्यक नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून देईल, असं राणा म्हणाले. यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. हैदराबादहून आलेल्या ओवेसींमुळे उत्तर प्रदेशात योगींचं सरकार बनत असेल तर मी सिंह आहे आणि कोलकात्यातही सिंह राहतात. मी कोलकात्याला राहायला जाईल, असं सांगतानाच ओवेसी मतांचं विभाजन करत असल्याचा दावा राणा यांनी केला.

    उत्तर प्रदेशात अलकायदा मॉडेल उघडकीस आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एजन्सी काय करत असतात हे सर्वांना माहीत आहे. कुकर बॉम्ब निघाला आहे. ओवेसींची कोणतीच एजन्सी चौकशी करत नाही. त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    दरम्यान, राणा यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी, “असं असेल तर मुनव्वर राणा यांनी दुसरे शहर किंवा राज्य शोधायला हवं कारण २०२२ मध्ये इथ पुन्हा योगीच सत्तेत असतील.”