प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

भोपाळमध्ये परिवारासोबत कारमधून प्रवास करत असणाऱ्या एका मुलाच्या कानाला मास्क लटकत होता. चेकिंग पॉइंट वरती उभ्या असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गाडीत बसलेल्या या दीड वर्षाच्या मुलाच्या नावाने १०० रुपयांची पावती फाडली आहे. कोरोना नियमांमध्ये मास्क नीट न घातल्यामुळे या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाला दंड आकारला आहे.

  भोपाळ, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क :

  कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. परिणामी प्रशासनाने नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिस जनतेकडून नियमांचे पाळन करवून घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी या नियमांचे पालन करवून घेताना पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद होतात तर कधी टोकालाही जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. त्यावरून लोकं पोलिसांच्या या कामावर राग व्यक्‍त करत आहेत.

  भोपाळमध्ये परिवारासोबत कारमधून प्रवास करत असणाऱ्या एका मुलाच्या कानाला मास्क लटकत होता. चेकिंग पॉइंट वरती उभ्या असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गाडीत बसलेल्या या दीड वर्षाच्या मुलाच्या नावाने १०० रुपयांची पावती फाडली आहे. कोरोना नियमांमध्ये मास्क नीट न घातल्यामुळे या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाला दंड आकारला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी या पावतीवर मुलाचे नाव गौरव पुरू जैन असे लिहिले. मात्र त्यावर मुलाचे वय न लिहिता वडिलांचे वय लिहिले आहे. गाडीतील चालकासह इतर सगळ्या लोकांनी मास्क लावलेला होता.

  पोलिसांची उडवत आहेत खिल्ली

  दीड वर्षाच्या मुलावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या आणि पावतीवर वडिलांचे वय लिहिणाऱ्या पोलिसांची लोक खिल्ली उडवत आहेत. एका बाजूला पोलिस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार नागरिकांसोबतचे आपले वर्तन बदलण्याचे सांगत आहे. फक्त नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देत आहेत.

  Police fine 18 month old boy for not wearing mask While making the acknowledgment Strange mistake