tds for post schemes

गुंतवणुकदाराने जर मागील तीन वर्षात आयटीआर भरला नाही तर टीडीएसची (TDS)खात्यामधून काढण्यात येणाऱ्या रकमेवरून कपात होते. टपाल विभागामधील योजनेमधून २० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आयटीआर न भरता काढली तर त्याच्या खात्यामधून २ टक्के रक्कम टीडीएससाठी कपात(TDS cutting) होणार आहे.

    दिल्ली: टपाल विभागाने (post department)टीडीएसच्या संदर्भात नवे आदेश(changes in tds cutting) काढले आहे. या आदेशानुसार २० लाखांहून अधिक रक्कम पोस्ट कार्यालयातून काढल्यास ग्राहकांना टीडीएस द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये पीपीएफच्या रकमेचाही समावेश आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायदा १९६१ मधील कलम १९४ एनमध्ये सुधारणा केली आहे.

    या तरतुदीनुसार गुंतवणुकदाराने जर मागील तीन वर्षात आयटीआर भरला नाही तर टीडीएसची  खात्यामधून काढण्यात येणाऱ्या रकमेवरून कपात होते. टपाल विभागामधील योजनेमधून २० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आयटीआर न भरता काढली तर त्याच्या खात्यामधून २ टक्के रक्कम टीडीएससाठी कपात होणार आहे. वित्तीय कायदा २०२० नुसार हा नियम १ जुलै २०२० पासून लागू झाला आहे. जर गुंतवणुकदाराने एका आर्थिक वर्षात १ कोटीहून अधिक रक्कम काढली तर त्याला ५ टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. ही टीडीएसची रक्कम १ कोटी रुपयांहून जास्त नसेल. टीडीएस कपातीनंतर टपाल विभागाकडून संबंधित खातेदाराला माहिती कळविली जाणार आहे.