‘गोमुत्र प्या म्हणजे कोरोना होणार नाही’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा!

सध्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जाता आहेत घरगुती उपचार सुचवले जात आहेत त्यामुळे वाढणाऱ्या संभ्रमात भर घालण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करू नये.

    भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. त्यांनी आता नवं वक्तव्य करून वादाला तोंड फोडलं आहे. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी दरररोज गोमूत्र पिते त्यामुळे मला कोरोना झालेला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असं मत प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यासाठी त्या आल्या होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

    प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारीच्या प्रकोपात सगळ्यांनीच खूप सावध रहायला हवं. सरकारने घालून दिलेल्या नियमांच सगळ्यांनी पालन करायला हवं. जगभरातले शास्रज्ञ कोरोनावरील लस आणि कोरोनाच्या विषाणूच्या नवनवीन रुपांवरील उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

    सध्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जाता आहेत घरगुती उपचार सुचवले जात आहेत त्यामुळे वाढणाऱ्या संभ्रमात भर घालण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करू नये. साध्वी  प्रज्ञा यांच्या या वक्तव्यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

    मध्य प्रदेशात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. काही दिवसांपूर्वी प्रज्ञासिंह यांच्या बंगल्यावरचा सगळा स्टाफ कोरोनाबाधित झाला होता. मध्य प्रदेशात गेल्या एका महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून गेल्या २४ तासांत ७ हजार ५७१ नवे रुग्ण सापडले.