प्रणव मुखर्जी यांची प्रकृती पुन्हा खालावली

प्रवण मुखर्जी यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच त्यांच्या तब्येतीवर स्पेशॅलिस्ट डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत.

 दिल्ली- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती पुन्हा खाल्यावल्याची माहिती समोर आली आहे. रूग्णालयाने आज बुधवारी जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमधून अशी माहिती मिळाली आहे. प्रवण मुखर्जी यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच त्यांच्या तब्येतीवर स्पेशॅलिस्ट डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत. 

दरम्यान आज सकाळी प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीटरच्या माध्यामातून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत त्यांच्या तब्येतील सुधार होत असल्याचे संकेत मिळत असल्याचं ट्वीटरच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. मात्र थोड्याच वेळात आता पुन्हा तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे.

प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट २०२० रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर ते कोमामध्ये होते. तसेच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती ढासाळत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे त्यांची कोरोनाशी झुंजही सुरुच आहे.