President Ramnath Kovind On UP Tour | तीन महिन्यांनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर ; रामलल्लाचे दर्शन घेणार | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
देश
Published: Aug 25, 2021 08:00 AM

President Ramnath Kovind On UP Tour तीन महिन्यांनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर ; रामलल्लाचे दर्शन घेणार

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
तीन महिन्यांनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर ; रामलल्लाचे दर्शन घेणार

२६ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती कोविंद दिल्लीहून लखनौला दाखल होणार आहेत. त्यानंतर बाबा भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. लखनौ येथील सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त २७ ऑगस्ट रोजी पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करणार आहे

  भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तब्बल तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा यूपी दौऱ्यावर जाणार आहेत. 26 ऑगस्टपासून राष्ट्रपतींचा दौरा सुरू होणार असून कोविंद अयोद्धेत देखील जाणार आहेत आणि रामलल्लाचे दर्शन देखील घेणार असल्याचे सांगितलं जात आहे. राष्ट्रपती कोविंद २६ ऑगस्ट रोजी राजधानी लखनौला दाखल होणार आहेत.

  २६ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती कोविंद दिल्लीहून लखनौला दाखल होणार आहेत. त्यानंतर बाबा भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. लखनौ येथील सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त २७ ऑगस्ट रोजी पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करणार आहे. यासोबतच ते शाळेच्या हजार क्षमतेच्या सभागृहाचे उद्घाटन करतील. यानंतर ते शाळेत मुलींच्या वसतिगृहाची पायाभरणीही करणार आहे.

  राष्ट्रपती कोविंद २८ ऑगस्ट रोजी गोरखपूरला जाणार असून आयुष विद्यापीठाच्या पायाभरणी आणि गोरक्षनाथ विद्यापीठातील रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तर २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लखनऊच्या चारबाग स्टेशनवरून राष्ट्रपती ट्रेनने अयोध्येला दाखल होणार आहेत.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २५ शनिवार
  शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

  महाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.