covaxin

भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. भारत बायोटेकच्या दरपत्रकानुसार कोव्हॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपये प्रतिडोस, खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रतिडोस इतक्या किंमतीला घ्यावी लागणार आहे. याशिवाय, परदेशात निर्यात करण्यासाठी लसीची किंमत १५ ते २० डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे. 

    सीरम इंस्टिट्यूटचे संस्थापक अदर पूनावला यांनी १ मे पासून कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केली असताना आता भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे.

    भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. भारत बायोटेकच्या दरपत्रकानुसार कोव्हॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपये प्रतिडोस, खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रतिडोस इतक्या किंमतीला घ्यावी लागणार आहे. याशिवाय, परदेशात निर्यात करण्यासाठी लसीची किंमत १५ ते २० डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे.

    दरम्यान, केंद्र सरकारसाठी कोव्हॅक्सिनचा दर १५० रुपयेच असणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.कोविशिल्ड लसीचे भारतातील दर हे जगभरातील दरांपेक्षा जास्त असल्याचं देखील समोर आलं होतं.

    जगभरात अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या भागात कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, भारतातील नव्या दरांनुसार लसीचा एक डोस आंतरराष्ट्रीय दरांनुसार ८ डॉलरपर्यंत जाणार आहे.