‘बर्ड फ्लू’मुळे चिकन आणि अंड्यांचे भाव कोसळले, सध्या इतक्या रुपयांना मिळतंय चिकन

वास्तविक, हिवाळा हा चिकन आणि अंड्यांच्या व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सुगीचा काळ मानला जातो. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात या मालाचा खप जास्त होत असतो. त्यामुळे हिवाळ्यात चिकन आणि अंड्यांचे भाव नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ‘बर्ड फ्लू’'चा शिरकाव झाल्यामुळे देशातील जवळपास सर्व राज्यातील चिकन आणि अंड्यांचे भाव कोसळू लागले आहेत.

भारतात ‘बर्ड फ्लू’ पसरल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर विविध राज्यात चिकन आणि अंड्यांच्या किंमतीत कमालीची घसरण होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात चिकन आणि अंडी यांचे भाव कोसळताना दिसतायत. महाराष्ट्रात चिकनचे भाव ८२ वरून ५८ रुपयांवर आलेत. गुजरातमध्ये तो ९४ रुपये प्रतिकिलो वरून ६५ रुपये प्रतिकिलो वर आलाय, तर तमिळनाडूमध्ये हा भाव ८० वरून ७० रुपये प्रति किलोवर घसरला आहे.

वास्तविक, हिवाळा हा चिकन आणि अंड्यांच्या व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सुगीचा काळ मानला जातो. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात या मालाचा खप जास्त होत असतो. त्यामुळे हिवाळ्यात चिकन आणि अंड्यांचे भाव नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ‘बर्ड फ्लू’’चा शिरकाव झाल्यामुळे देशातील जवळपास सर्व राज्यातील चिकन आणि अंड्यांचे भाव कोसळू लागले आहेत.

देशात एकूण दहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. यामध्ये केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. गेल्या बुधवारपासून वेगवेगळ्या राज्यात ‘बर्ड फ्लू’ने पक्षी मरण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे बॉयलर चिकनचा सरासरी ८०  रुपयांवर असणारा महाराष्ट्रातील भाव आता ५८ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे. अशाच प्रकारे विविध राज्यातील अंडी आणि चिकन यांचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार भारतात इतर ऋतूंमध्ये साधारण १ कोटी ३० लाख कोंबड्यांची विक्री होत असते. मात्र हिवाळ्यात हे प्रमाणात १ कोटी ५० लाखांवर जातं. तर उन्हाळा आणि पावसाळ्यात सरासरी २० कोटी अंडी रोज विकली जातात. मात्र हिवाळ्यात हे प्रमाण २८ ते २९ कोटी पर्यंत पोहोचतं.