जुनाट आणि कालबाह्य कायदे रद्द करणे गरजेचे, पंतप्रधानांचे आवाहन

देशाने पुढे जाण्याची मानसिकता निश्चित केली असून वेळ वाया घालवायला आम्ही तयार नाही. खासगी क्षेत्र देशाच्या विकासात उत्साहाने सहभागी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या या उत्साहाचे आम्ही स्वागतच करतो. त्यामुळेच आता आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध केल्या आहेत. असे मोदी म्हणाले.

    जुनाट आणि कालबाह्य कायदे रद्द करणे गरजेचे असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या संचालक मंडळ बैठकीत सांगितले आहे. तसेच आता केंद्र व राज्ये यांनी एकत्र येऊन आर्थिक विकासाची गती वाढवली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

    राज्यांनी नियम व निर्बंध कमी करण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात देशाला जे अपेक्षित होते तेच आम्ही दिले आहे. आता देशाने पुढे जाण्याची मानसिकता निश्चित केली असून वेळ वाया घालवायला आम्ही तयार नाही. खासगी क्षेत्र देशाच्या विकासात उत्साहाने सहभागी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या या उत्साहाचे आम्ही स्वागतच करतो. त्यामुळेच आता आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध केल्या आहेत. असे मोदी म्हणाले.

    निती आयोगाच्या संचालक मंडळ बैठकीत त्यांनी सांगितले, की खासगी क्षेत्राला यात पूर्ण संधी असून सरकारच्या आत्मनिर्भर योजनेत त्यांनी सहभागी व्हावे. केंद्र व राज्य सरकारे यांनी एकत्र काम केले तरच देशाची प्रगती होणार आहे. सरकारला आर्थिक प्रगतीचे श्रेय खासगी क्षेत्रालाही द्यावे लागणार आहे कारण त्यांचे प्रतिनिधित्वही यात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून देशाला विकासात प्रगतिपथावर नेण्याची गरज आहे.