narendra modi handover 7 project in bihar

नव्या कृषी कायद्यांची(agricultural laws) माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये शेतकरी महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित(narendra modi) होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला गैरजमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

नव्या कृषी कायद्यांची(agricultural laws) माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये शेतकरी महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित(narendra modi) होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला गैरजमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी यावेळी महासंमेलनाला जमलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधानांनी एमसपी, बाजार बंद होणार नाही. असा जो प्रचार केला जात आहे तो खोटा असल्याचे स्पष्ट केले. तसेच नव्या कृषी कायद्यांविरोधातील अनेक भ्रम दूर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हतं. मात्र आम्ही आता देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता शेतकऱ्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचं आव्हान केलं आहे.