पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा

  • ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना ट्विटरच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्ली – देशासह जगभरात आज शनिवार १ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहाच्या सण साजरा केला जात आहे. या ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना ट्विटरच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना म्हणाले की, ईद मुबारक!, ईद उल-अजहाच्या शुभेच्छा. हा दिवस आपल्याला न्याय, एकोपा आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देईल. बंधुता आणि करुणेची भावना अधिक वाढू दे. 

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उर्दू भाषेत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, ईद मुबारक. ईद-उल-अजहा हा सण परस्पर बंधुता आणि त्यागाच्या भावनेचे प्रतीक आहे. आणि लोकांना सर्वांच्या हितासाठी प्रेरित करत आहे. तसेच कोरोना काळात प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

राष्टप्रतींनी प्रथम उर्दू आणि नंतर हिंदीमध्ये ट्विट केले आहे. ईद-उल-अजहा हा कुर्बानीचा सण म्हणून ओळखला जातो. मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात सण साजरा करतात. सणाची सुरुवात ईदच्या प्रार्थनेनी सुरु होतो. सर्व मुस्लिम बांधव मशिदीत ईदची नमाज अदा करतात. यानंतर कुर्बानी दिली जाते.