पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, १०० दिवस कोविड ड्युटी करणाऱ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi big decision) यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

  देशात कोरोना रुग्णांची(Corona Situation in India) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. हेच विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

  नीट-पीजी परीक्षा कमीत कमी ४ महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल,असा निर्णय घेण्यात आला आहे.

  सोमवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. ते म्हणाले की, त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केले पाहिजे.

  कोविड रुग्णांच्या सेवेत १०० दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.

  काय आहेत निर्णय ?
  १) वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.

  २)ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.

  ३)सर्व कोविड योद्धे जे कोरोनाविरुद्ध १०० दिवसांच्या कर्तव्यासाठी तयार असतील आणि ते पूर्ण करतील त्यांना भारत सरकारच्या वतीने पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोरोना राष्ट्रीय सेवा पुरस्कार देखील देण्यात येईल.

  ४) पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.