पंतप्रधान मोदींनी केलं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर होणार चर्चा

अफगाणिस्तानमध्ये(Afghanistan) अडकलेल्या हिंदू आणि शीख तसेच अफगाणी नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन भारताने दिलं आहे.अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा केल्यानंतर बाकीचे देश आपल्या नागरिकांना तिथून परत आणत आहेत.

    अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा(Discussion On Situation Of Afghanistan ) करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात(All Party Meeting) आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तालिबानने सत्ता काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट केले आहे.

    अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिंदू आणि शीख तसेच अफगाणी नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन भारताने दिलं आहे.अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा केल्यानंतर बाकीचे देश आपल्या नागरिकांना तिथून परत आणत आहेत. तसेच काही अफगाणी नागरिकांना देखील भारतात आश्रय देण्यात येणार असल्याचे समजते. भारतीय वायू दलाने अफगाणिस्तानमधील भयानक परिस्थितीत रविवारी १०७ भारतीयांसह एकूण १६८ जणांना काबूलमधून बाहेर काढून भारतात आणले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    भारत सरकारने अफगाणिस्तानातून परतलेल्यांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.