आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा, ट्विटमध्ये म्हणाले….

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा (Message In Marathi By Narendra Modi) दिल्या आहेत.

    महाराष्ट्रात(Maharashtra) आषाढी आणि कार्तिकी एकादशी(Ekadashi) उत्साहात साजरी केली जाते. एकादशीला वारीचीही परंपरा आहे. मात्र कोरोनामुळे (Corona) यामध्ये बाधा आली.  दरम्यान आज आषाढी एकादशी असून आजच्या दिवशी सर्व पालख्या मोजक्या लोकांसह पंढरपुरात(Pandharpur) दाखल झाल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा (Message In Marathi By Narendra Modi) दिल्या आहेत.

    मोदी यांनी सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थणा केली,

    नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करुया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.”

    अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक नतमस्तक झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात शासकीय महापूजा पार पडली. कोरोनाचं संकट गडद होण्याची भीती असल्याने सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली होती; मात्र प्रतिनिधीक स्वरूपात मानाच्या दहा दिंड्यांना परवानगी देण्यात आली होती.