yogi aditya nath and narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi Praised Yogi Government) यांनी कोरोना नियंत्रणाबद्दल (Corona Control) योगी सरकारचं कौतुक केलं आहे.

    देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी(Corona Second Wave) लढत आहे. प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi Praised Yogi Government) यांनी आता कोरोना नियंत्रणाबद्दल(Corona Control) योगी सरकारचं कौतुक केलं आहे.

    आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटं आली.कोरोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला.
    पंतप्रधान पुढे म्हणतात, काशी हे शहर सध्या पूर्वांचलमधील खूप मोठं मेडिकल हब बनत आहे. ज्या आजारांच्या उपाचारासाठी आधी दिल्ली किंवा मुंबईला जावं लागायचं. त्याचे उपचार आता काशीमध्ये उपलब्ध आहेत.

    राज्यातल्या महिला सुरक्षेसंदर्भातल्या सुधारणा, भ्रष्टाचारावर आलेलं नियंत्रण, विकास अशा मुद्द्यांवरुनही पंतप्रधानांनी उत्तरप्रदेश सरकारचं कौतुक केलं आहे.