आत्मनिर्भरतेकडे भारताची वाटचाल सुरु, जगालाही भारताकडून अपेक्षा – नरेंद्र मोदी

भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi) यांनी केले आहे. ‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM Foundation Week 2020) संमेलनामध्ये त्यांनी हे भाष्य केेले आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi) यांनी केले आहे. ‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM Foundation Week 2020) संमेलनामध्ये त्यांनी हे भाष्य केेले आहे.

The world has confidence in the Indian economy. During the coronavirus pandemic when the world is distraught over channelling investments, we have received a record amount of FDI. We have to increase our domestic investments in order to sustain this confidence: PM Narendra Modi https://t.co/vo1KuTnxci

— ANI (@ANI) December 19, 2020

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सामर्थ्याच्या बळावर आणि उपलब्ध साधनांवर आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करत आहे.  उत्पादन निर्मितीवर लक्ष देण्यात येत आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत. मोदी देशातील उद्योजकांना उद्देशून म्हणाले की, गेल्या १०० वर्षांपासून आपण सर्वजण देशाच्या अर्थव्यवस्थेला, कोट्यवधी भारतीयांचे जीवन सुकर बनण्यासाठी कार्यरत आहात. आता नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीची वेळ आली आहे. आता आगामी काळात आत्मनिर्भर भारतासाठी तुम्हाला संपूर्ण ताकद लावायची आहे.

आपण किती लवकर आत्मनिर्भर होऊ याकडे लक्ष दिले पाहीजे.  ही वेळ भारतीय उद्योग जगाताच्या रुपाने तुमची क्षमता, बांधिलकी व धैर्य जगाला दाखवून देण्याची आहे.