आज संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ४ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चाललं आहे. तसेच एकीकडे संपूर्ण देश लॉकडाऊनच्या देशेने

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ४ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत.  यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करू देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चाललं आहे. तसेच एकीकडे संपूर्ण देश लॉकडाऊनच्या देशेने चालत आहे. तर दुसरीकडे भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर प्रश्न उपस्थित राहीले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहेत? हे अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे मोदी आज नेमकी कोणती भूमिका मांडणार आहेत? यावर संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलं आहे. 

भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे काल सोमवारी चीनच्या ५९ अँप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. तसेच रविवार २८ जून रोजी मन की बात या कार्यक्रमातून भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं होते. तसेच आता अनलॉक – २ सुद्धा उद्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान, भारत आणि चीन यांच्यामध्ये आज कमांडर स्तरावर तिसऱ्या टप्प्यात चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत हिंदी महासागरात गस्त वाढवणार असल्याचं समजलं जात आहे.