narendra modi handover 7 project in bihar

देशात अनलॉक-४ (Unlock-4) ही प्रक्रिया येत्या सप्टेंबर महिन्यापासून चालू होणार आहे. तसेच अनलॉक-४ बाबत केंद्राने नियमावली काल जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. तर काही गोष्टी बंधनकारक राहणार आहेत. नरेंद्र मोदी कायमच देशवासियांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी काय बोलणार आहेत, याकडे सर्व देशवासीय़ांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ‘मन की बात’मधून ( Mann Ki Baat) जनतेशी संवाद साधणार आहेत. देशात अनलॉक-४  (Unlock-4) ही प्रक्रिया येत्या सप्टेंबर महिन्यापासून चालू होणार आहे. तसेच अनलॉक-४ बाबत केंद्राने नियमावली काल जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. तर काही गोष्टी बंधनकारक राहणार आहेत. नरेंद्र मोदी कायमच देशवासियांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी काय बोलणार आहेत, याकडे सर्व देशवासीय़ांचं लक्ष लागलं आहे.

‘मन की बात’ या उपक्रमाअंतर्गत ते देशाशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे हे ६८ वे सत्र असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांच्या भेटीला येतील. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी देशातील नागरिकांकडून काही सल्ले मागवले होते, त्याच आधारावर आजचा मन की बात हा कार्यक्रम असल्याचं समजलं जात आहे.

कारगिल युद्धाची वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो, असं मोदी म्हणाले. तसेच  देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा, असंही ते यावेळी म्हणाले होते.