टाइम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव

अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम मॅगझिनने (Time magazine) यंदाच्या वर्षात २०२० मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध  (The list of 100 most influential people) केली आहे. या यादीत जगभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. परंतु या यादीत पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम मॅगझिनने (Time magazine) यंदाच्या वर्षात २०२० मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध  (The list of 100 most influential people) केली आहे. या यादीत जगभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. परंतु या यादीत पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. (Prime Minister Narendra Modi’s name in Time magazine)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्सायई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावापूर्वी स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई ( Sunder pichai) , अभिनेता आयुष्यमान खुराना ( Ayushmann Khurrana) , एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक स्वतंत्र निवडणुकाच नाही. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या ७ दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे, असे टाइम मॅगझिनने म्हटले आहे.

ब़ॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना ( Ayushmann Khurrana) हा या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कलाकार आहे. त्याने स्वत:च सोशल मीडिया अकाऊंटवर हा सन्मान मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच टाइम मॅगझिनने जारी केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाल्याने मला अभिमान वाटतो आहे, असे आयुष्मानने लिहिले आहे.