narendra modi handover 7 project in bihar

नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक (personal Twitter account hacked) करण्यात आले होते. हॅकरने नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले ट्विटर अकाऊंट हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून बिटकॉइन (Demand for Bitcoin)  देण्याची मागणी केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक (personal Twitter account hacked) करण्यात आले होते. हॅकरने नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले ट्विटर अकाऊंट हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून बिटकॉइन (Demand for Bitcoin)  देण्याची मागणी केली. हे खाते त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटशी जोडलेले होते. तसेच या खात्यावर त्यांचे २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु काही काळानंतर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले.

काय आहे हॅकर्सची मागणी ?

हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये तुम्ही देणगी द्या, असे मी आपणास आवाहन करतो. पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरून जवळपास अर्धा डझन ट्विट केले गेले. तसेच सर्व ट्विटमध्ये पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एजन्सी रॉयटर्सशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींची वैयक्तिक वेबसाइट नोंदणीकृत असल्याची कबुली दिली आहे.

बिटकॉइन म्हणजे नक्की काय?

बिटकॉइन एक प्रकारचे व्हर्च्युअल चलन आहे. डॉलर, रुपया किंवा पौंड यांसारख्या इतर चलनासारखी वापरली जाऊ शकते. तसेच ऑनलाइन पेमेंट व्यतिरिक्त डॉलर आणि इतर एजन्सीमध्ये देखील ते बदलले जाऊ शकते. २००९ मध्ये हे चलन बिटकॉइनच्या रूपात आले. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठी केला जात आहे.