पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ‘या’ महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रूपये, लवकर पुर्ण करा ‘हे’ काम

देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान (PM Kisan Scheme)  योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी ६००० रुपये देते. ६००० रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यात सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक (Bank Account) खात्यात थेट पाठवली जाते. हा हप्ता प्रत्येक वर्षी एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये ट्रान्सफर (transferred) केला जातो. चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते पाठवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान (PM Kisan Scheme)  योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी ६००० रुपये देते. ६००० रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यात सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक (Bank Account) खात्यात थेट पाठवली जाते. हा हप्ता प्रत्येक वर्षी एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये ट्रान्सफर (transferred) केला जातो. चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते पाठवण्यात आले आहेत. आता सरकार डिसेंबर २०२० मधेये या आर्थिक वर्षातील तिसरा हप्ता पाठवणार आहे. सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. उदाहरणार्थ, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांची जमीन असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती शेती करत असेल, पण त्याच्या नावावर शेतजमीन नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, जर एखादी व्यक्ती शेतकरी आहे पण ती सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झाला आहे. तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेच्या अंतर्गत डिसेंबरमध्ये २००० रूपयांचा लाभ घ्यायचा असेल तर उशीर न करता पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करा. याची पद्धत खुप सोपी आहे आणि घरबसल्या आपण या योजनेचा लाभ घेवू शकता.

पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे लागते. यासाठी https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Farmer corner टॅबवर क्लिक करा. https://pmkisan.gov.in या वेबसाइटवर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का? हे देखील तपासू शकता.