प्रीतम मुंडे – रक्षा खडसेंचा ‘तो’ VIDEO व्हायरल ; जाणून घ्या भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नेमका हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण

लोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा व्हिडीओ आहे वास्तविक दोन वर्षांपूर्वीचा. पण भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही बाजूंनी अनेक कमेंट्स यावर येत आहेत.

    मुंबई : आयुष्यात कधी कोणाला कशी कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. ही गोष्ट तर राजकारणातील लोकांना सगळ्यात जास्त लागू होते. राजकारण कुठले फासे कधी फिरतील आणि कुणाचे नशीब उदयास येईल आणि कुणाचे अस्तास जाईल हे सांगणे कठीण आहे. नुकताच केंदीय मंत्रिमंडळाचा विस्तार मोदी सरकारकडून करण्यात आला. त्यात महाराष्ट्राच्या डॉ भारती पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

    काय आहे व्हिडीओ
    लोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा व्हिडीओ आहे वास्तविक दोन वर्षांपूर्वीचा. पण भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही बाजूंनी अनेक कमेंट्स यावर येत आहेत.’ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच मंत्री झाल्या….’, असं म्हणत भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो व्हिडीओ काहींनी सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला आहे. दिंडोरी मतदारसंघातल्या पाणी प्रश्नाबद्दल भारती पवार बोलत होत्या. तिथे २०-२५ दिवसांनी एकदा पाणी येतं असं सांगून शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मी फडणवीस साहेब यांचे आभार मानते, असं त्या म्हणाल्या. पाण्यावरून गावा गावात, तालुक्या तालुक्यात, जिल्ह्या जिल्ह्यात वाद आहेत. पुढच्या काळात याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मोदी साहेबांचे आभार मानते त्यांनी जलशक्ती मंत्रालय उभारले, असंही भारती पवार म्हणाल्या. या भाषणादरम्यान मागे बसलेल्या खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना हसू आवरत नव्हतं.या व्हिडीओ मध्ये काही क्षण तर खडसे यांना इतकं हसू आलं की बाकाखाली लपून हसल्या, हेहीव्हिडीओ मध्ये दिसलं.वास्तविक या दोन खासदार भारती पवार यांना हसल्या की आणखी कुठल्या गोष्टीला हे स्पष्ट नाही. शिवाय त्या दोघींमध्ये आधीपासून कुठल्या गोष्टीवर बोलणं सुरू होतं हेही कळायला मार्ग नाही. पण व्हिडीओचा हा एवढाच तुकडा आता VIRAL होत आहे.