priyanka gandhi

हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या(hathras gang rape) घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पोलिसांनी कुटुंबीयांकडून पीडितेचं पार्थिव घेेतले आणि घाईनं अंत्यसंस्कार केले,असा आरोप होत आहे. या घटनेवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. प्रियंका गांधी(priyanka gandhi) यांनी या घटनेसंदर्भात योगींना काही प्रश्न विचारले आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी एक १९ वर्षीय दलित तरुणी आपल्या शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या तरुणीची जीभ कापलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झालेली होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून प्रियंका गांधींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत.

प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते… कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं हिसकावून घेत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कुणी दिला? गेल्या १४ दिवसांपासून तुम्ही झोपलेला होतात का ? तातडीनं पावलं का उचलली नाही? कधीपर्यंत असं चालत राहणार ? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?