अभिमानास्पद ! १५ वर्षाच्या भारतीय वंशाच्या गीतांजलीला टाईमचा ‘किड ऑफ द इयर’चा मान

न्यूयॉर्क: भारतासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली. टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय वंशाची अमेरिकेतील नागरीक गीतांजली रावला हा पुरस्कार मिळाला आहे. उदयोन्मुख वैज्ञानिक आणि संशोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंधरा वर्षीय गीतांजलीची निवड विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५ हजार मुलांमधून करण्यात आली.

न्यूयॉर्क: भारतासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली. टाइमच्या ‘किड ऑफ द इयर’चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय वंशाची अमेरिकेतील नागरीक गीतांजली रावला हा पुरस्कार मिळाला आहे. उदयोन्मुख वैज्ञानिक आणि संशोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंधरा वर्षीय गीतांजलीची निवड विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५ हजार मुलांमधून करण्यात आली.

गीतांजलीने सायबर गुंडगिरीच्या त्रासापासून वाचण्यासाठी एका अॅपची निर्मिती केली होती. या शोधाबद्दल बोलताना गीतांजलीने सांगितले की, Kindly हे अॅप असून क्रोम एक्सटेंशनदेखील आहे. याद्वारे सायबर गुंडगिरीला आळा घालता येऊ शकतो. या अॅपसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. फक्त जगाची समस्या सोडवावी यापुरते संशोधन मर्यादित नसून इतरांनीही अशाप्रकारचे संशोधन करावे, यासाठी त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न करत आहे.सध्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तिचे संशोधन सुरू आहे. ऑस्कर पुरस्कार विजेती आणि हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जॉलीने व्हिडिओ कॉन्फरन्सवर तिची मुलाखत घेतली.निरीक्षण करणे, त्यावर विचार करणे, त्यानंतर संशोधन आणि संवाद साधणे या मार्गाचा अवलंब संशोधनात करत असल्याचे गीतांजलीने आपल्या मुलाखतीत म्हटले.

गीतांजलीने सांगितले की, ती १० वर्षांची असताना तिने कार्बन नॅनोट्युब सेंसर टेक्नोलॉजीवर संशोधन करण्याबाबत विचार केला होता. आयुष्यातील बदलाला तिथूनच सुरुवात झाली असल्याचे सांगितले. यावर कोणी काम करत नाही. त्यामुळे हे काम मला करण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले.