आरारा खतरनाक – PUBG चा नवा विक्रम, २ आठवड्यांमध्येच तब्ब्ल २ मिलियन लोकांनी केलं प्री रजिस्ट्रेशन

पबजी मोबाइल इंडिया(PUBG Mobile India) अवतार म्हणजे बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाने एक नवा इतिहास घडवला आहे. या गेमला Google Play Store वर २० मिलियन प्री रजिस्ट्रेशन मिळाले आहेत.

  केंद्र सरकारने भारतात PUBG या गेमिंग अ‍ॅपसह ११८ चिनी अ‍ॅप बॅन केले होते. दरम्यान, पबजी(PUBG) गेम भारतात परतणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा गेम नव्या नावासह लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने या गेमसंबधीचा ट्रेलर यूट्यूबवर(Trailer launch) शेअर केला आहे. तसेच हा गेम आता प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले-स्टोरवर(Google Play Store) उपलब्ध झाला आहे.

  पबजी मोबाइल इंडिया(PUBG Mobile India) अवतार म्हणजे बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाने एक नवा इतिहास घडवला आहे. या गेमला Google Play Store वर २० मिलियन प्री रजिस्ट्रेशन मिळाले आहेत आणि तेही अवघ्या २ आठवड्यांत. एका निवेदनात Krafton ने म्हटले आहे की, अपकमिंग बॅटल रॉयल गेमची ही कामगिरी पाहून आम्हाला आनंद झाला आहे. या गेमसाठी १८ मेपासून प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात केली होती. या गेमच्या प्रमोशनसाठी कंपनीने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची मदत घेतली होती.

  क्रॉफ्टनने म्हटलं आहे की, बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाने पहिल्याच दिवशी ७.६ मिलियन प्री रजिस्ट्रेशन्स मिळवले आहेत. आतापर्यंतच्या एकूण प्री रजिस्ट्रेशन्सपैकी हा एक चतुर्थांश भाग आहे. एका दिवसात मिळालेल्या प्री रजिस्ट्रेशन्सच्या बाबतीत पबजी हा गेम फौजी या गेमपेक्षा खूप पुढे आहे. FAU-G या गेमला एका दिवसात १ मिलियन प्री-रजिस्ट्रेशन्स मिळाले होते. सध्या भारतीय युजर्स या गेमबाबत खूप उत्सुक आहेत.

  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, हा गेम भारतात १० जून रोजी लाँच केला जाईल. परंतु या गेमची लाँचिंग डेट थोडी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. Ghatak या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिजीत अंधारे यांनी ट्वीट केले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पुढील महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात लाँच केला जाईल. त्यामुळे अशी चर्चा आहे की, १३ जून ते १९ जून दरम्यान हा गेम लाँच होऊ शकते.

  Ghatak टीम Solomid ची प्रशिक्षक आहे आणि त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेलही आहे. काही अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया १८ जून रोजी लाँच केला जाऊ शकतो. याच दिवशी हा गेम लाँच होण्याची अधिक शक्यता आहे, कारण या तारखेपासून मागील महिन्यात प्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं होतं.क्राफ्टनने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्यूमेंटमध्ये सांगितलं आहे की, जे गेमर्स १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना आपल्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजेच पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर न देता ही मुलं पब्जी गेम खेळू शकणार नाहीत. ते या गेममध्ये साईन अपच करु शकणार नाहीत. पालकांच्या परवानगीनंतरच ही मुलं पबजी गेम साईन अप करु शकतील.

  परंतु येथे कंपनीची सर्वात मोठी चिंता ही आहे की, गेमर्स जो फोन नंबर देतील तो फोन नंबर बरोबर असेल का? कारण कोणताही युजर कोणाचाही फोन नंबर देऊन कंपनीची फसवणूक करु शकतात. अशा परिस्थितीत, कंपनी त्याबद्दल काय विचार करतेय, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या केवळ भारतीय बाजारातच लाँच केला जाईल. म्हणजेच हा गेम खास भारतीयांसाठीच असणार आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. निर्मात्यांनी यामध्ये ट्राय कलर (तिरंगी) थीम दिली आहे, जेणेकरुन भारतीय युजर्स याकडे आकर्षित होतील.

  गेम लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने स्पष्ट केले आहे की, गेमरचा डेटा कुठेही पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. यात डेटा गोपनीयता आणि युजर्सच्या सुरक्षेचा समावेश असेल.