पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ निवडणूक तिसरा टप्पा ; भाजपाची उमेदवार यादी जाहीर

पुदुच्चेरीच्या ९ विधानसभा जागांसाठीही उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या नावांचा निर्णय घेतला असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे.

    दिल्ली : तामिळनाडू व केरळ विधानसभा निवडणुकीच्या तिसरया टप्प्यासाठी भाजपाने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केरळच्या चार व तामिळनाडूच्या तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय पुदुच्चेरीच्या ९ विधानसभा जागांसाठीही उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या नावांचा निर्णय घेतला असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे.