धर्मांतर झाले नसल्यास मुस्लीम मुलीचा हिंदू मुलासोबतचा विवाह अवैध, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह(muslim girl marriage with hindu boy is not valid) केला असला तरी मुलीने धर्मांतर(religion change) केल्याशिवाय हा विवाह कायदेशीररित्या वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी मुलीला धर्मांतर करावे लागेल, असं पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयामध्ये म्हटलं आहे.

    चंदीगड: पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने(punjab and hariyana high court) एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला असला(muslim girl and hindu boy marriage तरी मुलीने धर्मांतर केल्याशिवाय हा विवाह कायदेशीररित्या वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी मुलीला धर्मांतर करावे लागेल, असं पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयामध्ये म्हटलं आहे. तरी दोघेही सहमतीने एकत्र राहू शकतात, हेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

    पंजाब आणि हरियाणा कोर्टामध्ये एका१८ वर्षीय मुस्लिम तरुणी आणि २५ वर्षीय हिंदू तरुणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टाने निर्णय महत्त्वाचा निर्णय दिला. या दोघांनीही हिंदू मंदिरामध्ये लग्न केलं आहे. मात्र, मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याशिवाय हा विवाह मान्य होणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. मात्र दोघंही सुजाण असल्याने सहमतीने राहू शकतात, हेदेखील न्यायालयाने सांगितले.

    या प्रकरणातील दोघांनी १५ जानेवारी रोजी शंकराच्या मंदिरात हिंदू पद्धतीने विवाह केला होता. या विवाहानंतर दोन्ही कुटुंबाकडून धमकी मिळायला लागली. त्यामुळे दोघांनी कोर्टात धाव घेतली. आम्ही अंबालाच्या एसपीकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही मदत न मिळाल्याने आम्हाला कोर्टात यावं लागल्याचं या दोघांनी कोर्टाला सांगितलं. आमच्याकडे कोर्टात येण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यानंतर कोर्टाने अंबालाच्या एसपीला या दोघांनाही तात्काळ सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.