‘आत्मनिर्भर भारत’वर रघुराम राजन यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह?, म्हणाले…

आत्मनिर्भर भारतवर (Atmanirbhar Bharat) रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे परिणाम संरक्षणवादाच्या रूपात होऊ नयेत, असं राजन म्हणाले.

आत्मनिर्भर भारतवर (Atmanirbhar Bharat) रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे परिणाम संरक्षणवादाच्या रूपात होऊ नयेत, असं राजन म्हणाले. म्हणजेच स्वदेशी मालाच्या स्पर्धेत परदेशी माल उतरू नये यासाठी स्वदेशी मालास सरकारने दिलेले संरक्षण घातक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं राजन यांना सुचित करायचं आहे.

यापूर्वीही अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे, असं राजन म्हणाले.

भारताला जागतिक उत्पादन यंत्रणेची आवश्यकता आहे आणि याचा अर्थ देशातील उत्पादकांना स्वस्त आयातीचा मार्ग मोकळा असावा. वास्तवाकडे पाहिलं तर भक्कम निर्यातीचा हे आधार बनू शकते, असंही ते म्हणाले. जागतिक पुरवठा व्यवस्थेचा एक भाग बनण्यासाठी पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सपोर्ट इत्यादी गोष्टी तयार करणं आवश्यक आहे.