शाळा बंद असल्याचा होऊ शकतो गंभीर परिणाम, रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

रघुराम राजन(Raghuram Rajan) यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं असेल याचा विचार करा.ते पुढे जात नाहीत इतकीच समस्या नाही तर ते विसरतही आहेत. जर तुम्ही दीड वर्षांपासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल. मला आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत आणेल. तसे झाले नाही तर आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी दिसेल.”

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे(Reserve Bank Of India) माजी गव्हर्नर रघुराम राजन(Raghuram Rajan) यांनी शाळा सुरु करण्याबाबत एक विधान केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, शाळा पुन्हा सुरू(Opening School) करण्यास आणि मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात आणखी उशीर आगामी दशकामध्ये देशासाठी त्रासदायक ठरू शकतो.

    रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं असेल याचा विचार करा.ते पुढे जात नाहीत इतकीच समस्या नाही तर ते विसरतही आहेत. जर तुम्ही दीड वर्षांपासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल. मला आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत आणेल. तसे झाले नाही तर आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी दिसेल.”

    मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाल्याने शाळा बंद करण्यात आल्या. युनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. आता ऑनलाईन क्लासेस सुरु झाले आहेत. यावर राजन म्हणाले की, अनेक मुलं उपकरणं किंवा इंटरनेटच्या अभावामुळे या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकलेले नाहीत मुलांच्या या संपूर्ण पिढीचा विचार करा, यापैकी ३०-४० टक्के शिक्षण सोडून देतात कारण त्यांना या शिक्षणाला सामोरे जाता येत नाही. ही एक मोठ्या प्रमावरील आपत्ती आहे.