लक्षद्वीपमधल्या नव्या नियमावरून विरोधकांनी उठवली टीकेची झोड, राहुल गांधीनीही साधला निशाणा,म्हणाले…

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी लक्षद्वीपसाठी(Lakshdweep) तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचा विरोध करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

    लक्षद्वीप (Lakshdweep) केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल पटेल(Praful Patel) यांच्या कारभारावरुन सध्या त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी लक्षद्वीपसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचा विरोध करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारवर समुद्रातील दागिना नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच लक्षद्वीपमधील नागरिकांसोबत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

    राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, लक्षद्वीप समुद्रातील भारताचं आभुषण आहे. सत्तेत असलेल्या अज्ञानी कट्टरपंथी हे नष्ट करू पाहात आहेत. मी लक्षद्वीपच्या जनतेसोबत उभा आहे”.

    केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या लक्षद्वीप येथे पाच महिन्यापूर्वी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. लक्षद्वीपमध्ये ९० टक्के जनता ही मुस्लिम आहे. दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत अपात्र ठरवण्याचा आणि गोमांसावर बंदी घालण्याची प्रस्ताव मांडल्याने केंद्रशासित प्रदेशात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी देखील लक्षद्वीपचा दुसरा काश्मीर तयार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

    दरम्यान, करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येसाठी पटेल यांना जबाबदार ठरवण्यात येत आहे.