rahul gandhi and narendra modi

राहुल गांधी म्हणाले, “आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हापासून पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे . पेट्रोलचे दर ४२ टक्क्यांनी व डिझेलचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत.”

    घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत झालेली वाढ हा जनतेवर अन्याय आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. “मोदी सरकार सगळ्यांना लुटत आहे. मात्र संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या दरामध्ये वाढ आहे”, असे म्हणत राहुल गांधी(Rahul Gandi Criticized Modi Government) यांनी मोदी सरकारवर टीका केली.

    राहुल गांधी म्हणाले, “आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हापासून पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे . पेट्रोलचे दर ४२ टक्क्यांनी व डिझेलचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ रुपये होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात ३२ टक्के घट झाली आहे. गॅसच्या किमतीत २६ टक्के घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत मात्र ११६ टक्के वाढ झाली आहे.”

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या व गॅसच्या किमतीमध्ये २०१४ च्या तुलनेत घट झाली असताना प्रत्यक्षात मात्र पेट्रोल. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनं तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.

    पंतप्रधान मोदींनी हे मान्य करायला हवं की १९९० च्या प्रमाणेच आताही यंत्रणा अपयशी ठरली असून त्यात बदल करण्याची गरज आहे. आम्हाला ते लक्षात आल्यावर १९९० मध्ये आम्ही ते मान्य केलं व १९९० ते २०१२ या काळात यंत्रणेमध्ये सुधारणा केल्या. मोदींनीही ते मान्य करावं आणि यंत्रणेमध्ये सुधारणा कराव्यात, असे ते म्हणाले. जर पंतप्रधानांना व अर्थमंत्र्यांना त्यांचे सल्लागार योग्य मार्ग दाखवत नसतील तर त्यांनी आमच्याकडे यावं. काँग्रेस पक्षाला अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे.