“मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक”, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली मोदी सरकारवर टीका

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन किंवा मदत देत नाहीत.लोकांकडून नोकरी हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारतीयांनी आत्मनिर्भरतेच ढोंग करावं, अशी अपेक्षा आहे. जनहितार्थ जारी”, असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी केलं आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) रोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर(Modi Government) टीका करत असतात. आजही त्यांनी बेरोजगारीवरून(Unemployment) त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणं निष्क्रिय असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

    “रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन किंवा मदत देत नाहीत.लोकांकडून नोकरी हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारतीयांनी आत्मनिर्भरतेच ढोंग करावं, अशी अपेक्षा आहे. जनहितार्थ जारी”, असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

    गेल्या ऑगस्टमध्ये १५ लाखांहून अधिक लोक औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रांतून बेरोजगार झाले आहेत, अशी माहिती सीएमआयईने आपल्या अहवालात दिली आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे आणि यामुळे जनतेला त्रास होत आहे.