#अबकी_बार_करोड़ों_बेरोजगार,कौन जिम्मेदार ? सिर्फ़ और सिर्फ़ मोदी सरकार! – राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अब की बार मोदी सरकार’ (Modi Government) या घोषवाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अब की बार मोदी सरकार’ (Modi Government) या घोषवाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

  “अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर ‘अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला. राहुल गांधी यांनी ट्विट केल्यानंतर त्यावर काँग्रेस आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.यापूर्वीही ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  गेल्या काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्याच पक्षाचे काही नेते, काही मित्र आणि काही पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. यामध्ये वायनाडच्या कार्यालयातले काही लोक आणि दिल्लीतल्या काही ज्येष्ठ पत्रकारांचाही समावेश आहे. राहुल यांच्या या कृतीची सोशल मीडियावर तसंच राजकीय वर्तुळांमध्येही जोरदार चर्चा आहे.